|| श्री ||
चैत्र -वैशाख २०६७ -२०६८ चतुर्थी
७ एप्रिल २०११ चैत्र -वैशाख २०६७ -२०६८ चतुर्थी
| यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । | अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् |
माझा उपवास अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ
http://www.indiaagainstcorruption.org
दिवस पहिला
आपल्या हिंदू नववर्षाची म्हणजेच गुढीपाडव्याची सुरुवात अगदी मस्त झाली..आपल्या भारतीय क्रिकेट संघाने १२५ करोड भारत वासियांना "क्रिकेट वर्ल्ड कप " जिंकून नववर्षाची अमूल्य भेट दिली. आपल्या सचिन चा शेवटचा राहिलेला मानाचा तुरा देखील त्याला मिळाला. क्रिकेट जगतावर सलग दोन दशक अधिराज्य गाजवणारा हा अनभिषिक्त सम्राट भारत देशाच्या मातीत जन्माला आला ..याचा विचार करून राहून राहून अजूनही अभिमानाने छाती फुलून येते. संपूर्ण भारतभर अवघ्या तरुणाई ने जो काही उस्फुर्त जल्लोष केला, तो मन भारावून टाकण्यासारखा होता. या पार्श्वभूमीवरच,मी परवा नासिक हून पुणे ला रेल्वे ने प्रवास करत असताना एक तरुण भेटला. मग क्रिकेट च्या गप्पामध्ये ६-७ तासांचा प्रवास कसा निघून गेला कळलेच नाही. त्या गप्पांच्या ओघात तो तरुण एक गोष्ट बोलून गेला..ती फारच अस्वस्थ करणारी पण तरीसुद्धा एक आशेचा किरण देणारी होती. तो म्हणाला, जेव्हा त्याने भारतीय क्रिकेट संघाला "वर्ल्ड कप " उचलताना पाहीले तेव्हा खूप आनंद झाला पण कुठेतरी खूप दुखः देखील झाले. मी विचारले का रे दुखः का ? तो म्हणाला, त्या क्रिकेट संघातील युवकांना देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली , आम्हा युवकांना ती मिळत नाही आहे. आमचे आयुष्य हे रोजच्या जगण्या मरण्याच्या लढाईतच संपत आहे. महागडे शिक्षण घेयून झाल्यावर नोकरी शोधण्यामध्ये बेरोजगार तरुणांची होणाऱ्या दयनीय अवस्थेचा तो जिवंत उदाहरण होता. आजच्या युवा पिढीच्या नावाने हंबरडे फोडताना, या तरुण पिढीच्या मनात खदखदणारा असंतोष आणि त्यांचे व्यथित मन समजून घेण्यात काहीतरी चुकतेय..युवा मन समजून घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा...तो या पुढे आपण करूच...
सध्या आपल्या भारत देशातले वातावरण कसे आहे , हे आपण रोज़ टी व्ही च्या माध्यमातून पाहतच आहोत. १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले असे आपल्याला लहानपणापासून शाळेत शिकवण्यात आले. परंतु देशासोबत केवढा मोठा धोका काही सत्तापिपासू लोकांनी केला, याचे वर्णन आपण ऐकतच असाल. भारताच्या नैसर्गिक, दैवी , मानवी संपत्तीचे शोषण हे अहोरात्र चालू आहे, हजारो वर्षापासून..आधी परकीयाकडून आणि आता आप्तस्वकीयांकडूनच...एका बाजूला भ्रष्टाचार, महागाई, गरिबी, गुन्हेगारी, रोगराई , नक्षलवाद ,आतंकवाद , जल ,वायू यांचे प्रदूषण अशा समस्या त्याच्या चरण सीमांना पोहचल्या आहेत. तर दुसरीकडे भारत जागतिक महासत्ता बनण्याच्या मार्गावर तीव्रतेने अग्रेसर होतोय. काही भारतीयांना मनात याबाबत शंकाच आहे आणि ती रास्तदेखील आहे ..देशासमोर एवढ्या प्रखर समस्या उभ्या असताना आपण , महासत्ता होण्याचे स्वप्न बघूच कसे शकतो. परंतु सद्य परिस्थितीमध्ये जगाला भेडसावणाऱ्या कित्येक समस्याचे समाधान, हे भारतीयांना मिळालेल्या पूर्वजांच्या ज्ञानाच्या वारशात दडलेले आहे. दुर्देवाने हे सगळे ज्ञान भारताच्या युवा पिढीपासून एक तर लपवून ठेवण्यात आले किंवा त्याच्या मनात त्याविषयी अनास्था निर्माण करण्यात आली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक , शहीद भगत सिंग यांच्याबद्दल थोडीफार माहिती देण्यात आली. परंतु मोहनदास मधून "महात्मा ", बाळ मधून "लोकमान्य " ज्यामुळे घडले, ती भगवदगीता आपल्याला शिकवण्यात आली नाही.
असो. आपण सर्वाना माहितीच असेल की, महाराष्ट्रातील अग्रणी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली मध्ये "भ्रष्टाचाराची आरपार लढाई" सुरु झाली आहे. या चळवळीला किरण बेदी , श्री श्री रविशंकर , अरविंद केजरीवाल, बाबा रामदेव यासारख्या मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे. आपल्या मनात काही शंका असतील, की मागील जे ५०-६० वर्षे जे झाले नाही ते आता काय होणार, यातून काहीही होत नाही , होणार नाही. आपण एक लक्षात घेतले पाहिजे की, जे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतोय ती देशाची अवस्था आहे, क्षमता नव्हे. अरब देशामध्ये सध्या जी क्रांती चालू आहे, त्यावरून असे लक्षात येते की, जनतेने एकजूट दाखवली तर, कितीही शक्तिशाली व्यवस्था असो, ती मोडून काढता येतो... हा भारताचा ऐतिहासिक क्षणआहे
काही दिवसापूर्वी वाचनात आले होते की , प्लासी ची लढाई जी इंग्रजासोबत झाली होती, त्यामध्ये जेवढे लोक लढत होते , त्याच्या कितीतरी पट लोक रस्त्याच्या बाजूला गंमत बघत उभे होते. नियतीची करणी बघा, गंमत बघता बघता मनोरंजन करून घेताना, आपला देश गुलाम होईन पुढील १५० वर्षासाठी, याची पुसटशी देखील कल्पना नसेल त्या प्रेक्षकांना... जर त्या प्रेक्षकांनी लढणाऱ्या लोकांना तेव्हा साथ दिली असती, तर आज भारताचा इतिहास हा काय असता हे वेगळे सांगायला नको. या गोष्टीची कल्पना आपणास लगेच येऊ शकते, जर आपण या गोष्टीकडे आपले लक्ष वेधले की , कित्येक भारतीयांनी सरकारी प्रोत्साहनाशिवाय जगात आपले स्थान निर्माण केले , देशवासीयांची मान अभिमानाने उंचावली. जर या भारतीयांना सरकारी प्रोत्साहन मिळाले असते तर, त्यांच्या मध्ये काय निर्माण करण्याची क्षमता होती..याची आपणास जाणीव झाली असती.
आजचा दिवस, अण्णांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस. मी ठरवले आहे..निकाल काय व्हायचा हो होईन या आंदोलनाचा ..पण मी कमीत कमी प्रेक्षकांमध्ये नाही राहायचे...म्हणून आजपासून अण्णांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून आजपासून उपवास करायचे ठरवले आहे...बघुयात देवाच्या कृपेने किती दिवस चालतो ते...ईश्वराने शक्ती द्यावी अशी प्रार्थना ...
तुम्ही काय ठरवलेय ?.........
तुम्ही कसे सहभागी होयू शकता ?
तुम्ही पण उपवास करा अर्धा दिवस , १ दिवस, २ दिवस ..जेवढे शक्य होईन तेवढा करा...आपल्या घरी , ऑफिसमध्ये , शाळा, महाविद्यालय मध्ये जिथे असला तिथे करा आणि हा ब्लोग फौलो करा ..उपवास सुरु केल्यावर ब्लोग वर कळवा.
उपवास सुरु करताना खालील उदाहरणाप्रमाणे माहिती कळवा.
नाव: प्रदीप रमेश पाटील
शहर : पुणे
राज्य : महाराष्ट्र
मोबाईल क्रमांक :
ई-पत्ता (E-mail ID) :
दिनांक: ७ एप्रिल २०११
किती काळ उपवास करणार : २४ तास
आई तुळजा भवानी शक्ती दे, भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचे मर्दन करण्यासाठी.....
हर हर महादेव ..जय भवानी जय शिवाजी
|| यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ||
|| वंदे मातरम ||
|| वंदे मातरम ||
नाव: shweta
ReplyDeleteशहर : bangalore
राज्य : karnataka
मोबाईल क्रमांक :
ई-पत्ता (E-mail ID) :
दिनांक: ७ एप्रिल २०११
किती काळ उपवास करणार : २४ तास
नमस्कार..
ReplyDeleteनाव: सचिन
शहर : पुणे
राज्य : महाराष्ट्र
मोबाईल क्रमांक : ९८२२२३५०९१
ई-पत्ता (E-mail ID) : sachingadhe@gmail.com
दिनांक: ७ एप्रिल २०११
किती काळ उपवास करणार : २४ तास
Swati
ReplyDeleteThis comment has been removed by the author.
ReplyDeleteSharanu
ReplyDeleteनाव: Srinija
ReplyDeleteशहर : bangalore
राज्य : karnataka
मोबाईल क्रमांक :
ई-पत्ता (E-mail ID) :
दिनांक: ७ एप्रिल २०११
Place: Bangalore
ReplyDeleteState: Karnataka
नाव: Surekha
ReplyDeleteशहर : gulbarga
राज्य : karnataka
मोबाईल क्रमांक :
ई-पत्ता (E-mail ID) :
दिनांक: ७ एप्रिल २०११
किती काळ उपवास करणार : २४ तास
we are in support of you...
ReplyDeleteनाव: Deepa
ReplyDeleteशहर : Pune
राज्य : MH
दिनांक: ७ एप्रिल २०११
किती काळ उपवास करणार : २४ तास
Shubhank:The kind of protest this old aged person is doing is really great. When he can do this y cant the youngsters do it. Guys Pls support him..
ReplyDeleteEmail:shubhankharwalkar@gmail.com
Place: Bangalore
ReplyDeleteState: Karnataka
Let us join with ANNA HASARE ji to fight against corruption.
ReplyDeleteThe point is that all these politicians and influential peoples do not have any qualification or for that matter extraordinary skill, still they possess enormous wealth. HOW???
ReplyDeleteAll these years we use to say I hate corruption, stop corruption, India is still behind because of corruption.
A 72 year old man is giving us chance, voice your agitation.
Its Now or Never...Shri Hazare we are with you!
Jai Hind!!!
This comment has been removed by the author.
ReplyDeleteWe are in support of you ANNA HAZARE Ji..........
ReplyDeleteJAI HIND !!!!!!!!!!!!!!
नाव: Sumit Koparde
ReplyDeleteशहर : New York
Country : USA
मोबाईल क्रमांक :
ई-पत्ता (E-mail ID) : sumitkoparde@yahoo.com
दिनांक: 8 एप्रिल २०११
किती काळ उपवास करणार : २४ तास
Those who are reading this post please take it personal. Because this country belongs to you and each individual are strong pillar of this country.
I'm really fed of to this Indian politician people. Most of the political guys have no sense (incapable) to run our country and put no effort towards to make us proud on them.
We are demanding Anti-corruption law to be passed and political view to be more transparent otherwise leave your position and sit at home. This is a time to rise India. We youth of India need to support (72 year old man)Shri. Annna Hajare.
I'm not a follower of Anna but I like the fact that he is doing for all of us. Salute against his fight towards corruption in government.
Jai Hind !!!
Name: priyanka Gawate
ReplyDeletePlace: Pune
Date: 7 April 2011
Duration of fast: 12 hr