दिवस दुसरा : माझा उपवास अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ
दिवस दुसरा : माझा उपवास अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ
|| श्री ||
चैत्र -वैशाख २०६७ -२०६८ पंचमी
८ एप्रिल २०११ चैत्र -वैशाख २०६७ -२०६८ पंचमी
ही लढाई राजकीय आहे का ?
पहिला दिवस झाला..उपवासाचा.. बऱ्याच जनतेने भरभरून प्रतिसाद दिला..काहींनी अभिनंदन केले..काहीना कौतुक वाटले..काहींनी उपहासात्मक हास्य देखील दिले...काहींनी शंका-कुशंका उपस्थित केल्या ..तू केलेल्या उपवासाने काय होणार आहे..कुणाला समजणार आहे..काही उपयोग नाही.. हे राजकीय प्रकरण आहे ..आपण यापासून ४ हात दूर राहिलेले बरे ..इत्यादी इत्यादी
काही प्रश्न उपस्थित झाले, ते स्वतःमध्ये उत्तर दडवूनच...उदाहरणार्थ..कुणाला समजणार आहे का तुझा उपवास ? आता हे बघा ना..हा प्रश्न उपस्थित करता करता..त्याचे लक्ष तर कमीत कमी ..या जनआंदोलनाकडे वेधले गेले..हे काय कमी आहे.. मनुष्य फार गमतीदार प्राणी आहे..कित्येक गोष्टी नकळत होतात आपल्याकडून आणि आपल्याला त्याचा सुगावा पण लागत नाही...काही वेळेस त्या बरोबर असतात काही वेळेस चूक...
आता याचा विचार करता करता...एक प्रश्न मला पडला..का मिडिया ला आपला उपवास कळला तरच .उपवास करणे फायद्याचे ठरेन का? आपण असे विवश होयून किती दिवस जीवन गाडी ढकलायची..
तुम्हाला ही लढाई राजकीय वाटते आहे का ? मला वाटते ही लढाई राजकीय नाही..हो तिला एक राजकीय पैलू जरूर आहे ..पण लढाई जनतेची.. विश्वास बसत नाही आहे का?
तुम्हाला शाळा, महाविद्यालयांमध्ये , प्रवेश मिळवण्यासाठी ,स्कॉलर शिप मिळवण्यासाठी द्यावी लागलेली लाच... घर विकत घेताना किती त्रास होतो ..जेव्हा द्यावा लागणारा "Black Down Payment Amount " आणि " White Amount " हे राजरोसपणे मागितले जाते..त्याची पावती मिळणार नाही..असे वरून मग्रुरपणे सांगितले जाते ..तुमची लायकी आणि अक्कल काढली जाते .तुम्ही जास्त प्रश्न विचारून, थोडा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर...की बाबानो काय चालू आहे.. चिडचिड होते ना..
आय टी वाल्याच तर अवघड जागेचे दुखणे होयून बसले आहे..कुणाला सांगता ही येत नाही ..आणि सहन ही होत नाही...बेसुमार पैशाखाली दाबून दाबून त्यांचा कस काढला जातोय...ऑफिस मध्ये होणाऱ्या चीड चीड चे आपण परत गाऱ्हाणे गायला नको ..पण जरा , आय टी मध्ये शिरायच्या आधी आणि तिथून बाहेर पडल्यानंतर काय होते बघू...
नुकताच १२ वी पास होयून पोरगा बाहेर पडला...आणि निघाला आपले गाठोडे घेयून आपला बस ने पुण्याला सी. ओ.ई .पी च्या दिशेने ..इंजिनीरिंग ला प्रवेश घ्यायला . बस वाहकाकडून तिकीट घेतले ५०० रुपये देयून. बस भाडे १९० रुपये ..वाहकाने ३०० रुपये परत केलेत आणि १० रुपये त्यांच्या खिशात ..काहो काका १० रुपये राहिले ना म्हणून विचारले ..तर वाहक काका मोठे चतुर..म्हणतात कसे अरे बेट्या तू आता आय टी इंजिनिअर होणार ना ..मग गले लठ्ठ पगार कमावशील तू ..मग थोडे फार आतापासून आम्हाला पण मिळाले तर तुझे बिघडले कुठे ? अहो काका पण अजून मी प्रवेश घ्यायचा आहे ..अरे पण तू शेवटी कोणताही इंजिनिअर झालास तरी कोणताही तरी आय टी मध्येच नोकरी मिळते हल्ली..मग काय पगार घसघशीत मिळणार ना तुला..मग आतापासून थोडा खर्च करायला शिक जरा...चाल जा तिकडे बस तुझ्या शीटवर..
काय लोक पण ..किती संकुचित मन ..असे आपले वाहक काका पुटपुटत जातात.. आय टी इंजिनिअर होण्याआधीच हा खुशखुशीत किस्सा..
आता आय टी इंजिनिअर होयून नोकरी लागली..पहिल्या महिन्याचा पगार झाला , मग काय आनंद साजरा करायला गेलात भुर्रर मामाच्या गावाला.. तिकडे भेटलात मामाच्या टग्या मित्रांना ..आय टी इंजिनिअर होयून नोकरी लागून तुम्ही आनंदाची बातमी त्यांना दिली..मग काय पार्टी देणे आलेच ..आता तुम्ही चहा वगैरे पाजायचे म्हणालात तर मग तुमच्या अब्रूच्या धिंडवडे निघालेच म्हणून समजायचे. काय राव तुम्ही आय टी इंजिनिअर आहात ..पार्टी म्हणजे कशी झाक झाली पाहिजे ..२-४ हजार खर्च झाला पाहिजे मस्त दारू सिगारेट वर... तेव्हा म्हणू खरे आय टी इंजिनिअर.. आता या टग्या महाशयांना कोण सांगणार ..बाबा रे ..आय टी इंजिनिअर व्हायला आणि तो झाल्यानंतर नोकरी करायला काय काय घासावे लागते ते..आणि किती किती वेळ, तो भाग वेगळा.
किस्से तसे बरेच आहेत..आपण विषय भरकटलो खूपच ..पण आता आपण मुद्द्याकडे वळूयात.. आय टी इंजिनिअर नेमकी नोकरी कुणासाठी करतात आणि जगतात कुणासाठी ..हे मोठे मोलाचे प्रश्न पडतात.
गलेलठ्ठ पगार आला की गलेलठ्ठ जबाबदाऱ्या, ऑफिस मधल्या पार्ट्या , घरचे मुलाचे /मुलीचे शाळेतले शिक्षण पण कसे उच्च प्रतीच्या शाळेत झाले पाहिजे..सैट मीरा आंतरराष्ट्रीय विद्यालय सारखे .काहीतरी
आता त्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यालयामध्ये १ ली , २ री च्या मुलांना काय आंतरराष्ट्रीय शिकवतात ते ..राम जाणे
क्रमश :
No comments:
Post a Comment