Friday, 8 April 2011

ही लढाई राजकीय आहे का ?

दिवस दुसरा : माझा उपवास अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ   

दिवस दुसरा : माझा उपवास अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ   

|| श्री ||

चैत्र -वैशाख  २०६७ -२०६८  पंचमी 
                                                         ८  एप्रिल २०११
                                                                           
 ही लढाई राजकीय आहे का ?

पहिला दिवस झाला..उपवासाचा.. बऱ्याच जनतेने भरभरून प्रतिसाद दिला..काहींनी अभिनंदन केले..काहीना कौतुक वाटले..काहींनी उपहासात्मक हास्य देखील दिले...काहींनी शंका-कुशंका उपस्थित केल्या ..तू केलेल्या उपवासाने काय होणार आहे..कुणाला समजणार आहे..काही उपयोग नाही.. हे राजकीय प्रकरण आहे ..आपण यापासून ४ हात दूर राहिलेले बरे ..इत्यादी इत्यादी
काही प्रश्न उपस्थित झाले, ते स्वतःमध्ये उत्तर दडवूनच...उदाहरणार्थ..कुणाला समजणार आहे का तुझा उपवास ? आता हे बघा ना..हा प्रश्न उपस्थित करता करता..त्याचे लक्ष तर कमीत कमी ..या जनआंदोलनाकडे  वेधले गेले..हे काय कमी आहे.. मनुष्य फार गमतीदार प्राणी आहे..कित्येक गोष्टी नकळत होतात आपल्याकडून आणि आपल्याला त्याचा सुगावा पण लागत नाही...काही वेळेस त्या बरोबर असतात काही वेळेस चूक...
आता याचा विचार करता करता...एक प्रश्न मला पडला..का मिडिया ला आपला उपवास कळला तरच .उपवास करणे फायद्याचे ठरेन का? आपण असे विवश होयून किती दिवस जीवन गाडी ढकलायची..
तुम्हाला ही लढाई राजकीय वाटते आहे का ? मला वाटते ही लढाई राजकीय नाही..हो तिला एक राजकीय पैलू जरूर आहे ..पण लढाई जनतेची.. विश्वास बसत नाही आहे का?
तुम्हाला शाळा, महाविद्यालयांमध्ये , प्रवेश मिळवण्यासाठी ,स्कॉलर शिप मिळवण्यासाठी  द्यावी लागलेली लाच... घर विकत घेताना किती त्रास होतो ..जेव्हा द्यावा लागणारा  "Black  Down Payment Amount " आणि  " White Amount " हे राजरोसपणे मागितले जाते..त्याची पावती मिळणार नाही..असे वरून मग्रुरपणे सांगितले जाते ..तुमची लायकी आणि अक्कल काढली जाते .तुम्ही जास्त प्रश्न विचारून, थोडा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला तर...की बाबानो काय चालू आहे.. चिडचिड होते ना..
आय टी वाल्याच तर अवघड जागेचे दुखणे होयून बसले आहे..कुणाला सांगता ही येत नाही ..आणि सहन ही होत नाही...बेसुमार पैशाखाली दाबून दाबून त्यांचा कस काढला जातोय...ऑफिस मध्ये होणाऱ्या चीड चीड चे आपण परत गाऱ्हाणे गायला नको ..पण जरा , आय टी मध्ये शिरायच्या आधी आणि तिथून बाहेर पडल्यानंतर काय होते बघू...
नुकताच १२ वी पास होयून पोरगा बाहेर पडला...आणि निघाला आपले गाठोडे घेयून आपला बस ने पुण्याला सी. ओ.ई .पी च्या दिशेने ..इंजिनीरिंग ला प्रवेश घ्यायला . बस वाहकाकडून तिकीट घेतले ५०० रुपये देयून. बस भाडे  १९० रुपये ..वाहकाने ३०० रुपये परत केलेत आणि १० रुपये त्यांच्या खिशात ..काहो काका १० रुपये राहिले ना म्हणून विचारले ..तर वाहक काका मोठे चतुर..म्हणतात कसे अरे बेट्या तू आता आय टी इंजिनिअर होणार ना ..मग गले लठ्ठ पगार कमावशील तू ..मग थोडे फार आतापासून आम्हाला पण मिळाले तर तुझे बिघडले कुठे ? अहो काका पण अजून मी प्रवेश घ्यायचा  आहे ..अरे पण तू शेवटी कोणताही इंजिनिअर झालास तरी कोणताही तरी  आय टी मध्येच नोकरी मिळते हल्ली..मग काय पगार घसघशीत मिळणार ना तुला..मग आतापासून थोडा खर्च करायला शिक जरा...चाल जा तिकडे बस तुझ्या शीटवर..
काय लोक पण ..किती संकुचित मन ..असे आपले वाहक काका पुटपुटत जातात.. आय टी इंजिनिअर होण्याआधीच हा  खुशखुशीत किस्सा..

आता आय टी इंजिनिअर होयून नोकरी लागली..पहिल्या महिन्याचा पगार झाला , मग काय आनंद साजरा करायला गेलात भुर्रर मामाच्या गावाला.. तिकडे भेटलात मामाच्या टग्या मित्रांना ..आय टी इंजिनिअर होयून नोकरी लागून तुम्ही आनंदाची बातमी त्यांना दिली..मग काय पार्टी देणे आलेच ..आता तुम्ही चहा वगैरे पाजायचे म्हणालात तर मग तुमच्या अब्रूच्या धिंडवडे निघालेच म्हणून समजायचे. काय राव तुम्ही आय टी इंजिनिअर आहात ..पार्टी म्हणजे कशी झाक झाली पाहिजे ..२-४  हजार खर्च झाला पाहिजे मस्त दारू सिगारेट वर... तेव्हा म्हणू खरे आय टी इंजिनिअर.. आता या टग्या महाशयांना कोण सांगणार ..बाबा रे ..आय टी इंजिनिअर व्हायला आणि तो झाल्यानंतर नोकरी करायला काय काय घासावे लागते ते..आणि किती किती वेळ, तो भाग वेगळा.

किस्से तसे बरेच आहेत..आपण विषय भरकटलो खूपच ..पण आता आपण मुद्द्याकडे वळूयात.. आय टी इंजिनिअर नेमकी नोकरी कुणासाठी करतात आणि जगतात कुणासाठी ..हे मोठे मोलाचे प्रश्न पडतात.
गलेलठ्ठ पगार आला की गलेलठ्ठ जबाबदाऱ्या, ऑफिस मधल्या पार्ट्या , घरचे मुलाचे /मुलीचे शाळेतले शिक्षण पण कसे उच्च प्रतीच्या शाळेत झाले पाहिजे..सैट मीरा आंतरराष्ट्रीय विद्यालय सारखे .काहीतरी
आता त्या आंतरराष्ट्रीय दर्जाचे विद्यालयामध्ये १ ली , २ री च्या मुलांना काय आंतरराष्ट्रीय शिकवतात ते ..राम  जाणे

क्रमश :

 

Thursday, 7 April 2011

माझा उपवास अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ --दिवस पहिला

|| श्री ||

चैत्र -वैशाख  २०६७ -२०६८  चतुर्थी
                                                                   ७ एप्रिल २०११


    | यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । 
| अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ |




माझा उपवास अण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ 
http://www.indiaagainstcorruption.org
 
दिवस पहिला

आपल्या हिंदू नववर्षाची म्हणजेच गुढीपाडव्याची सुरुवात अगदी मस्त झाली..आपल्या भारतीय क्रिकेट संघाने १२५ करोड  भारत वासियांना "क्रिकेट वर्ल्ड कप " जिंकून  नववर्षाची अमूल्य भेट दिली. आपल्या सचिन चा शेवटचा राहिलेला मानाचा तुरा  देखील त्याला  मिळाला. क्रिकेट जगतावर सलग दोन दशक अधिराज्य गाजवणारा हा अनभिषिक्त सम्राट भारत देशाच्या मातीत जन्माला आला ..याचा विचार करून राहून राहून अजूनही अभिमानाने छाती फुलून येते. संपूर्ण भारतभर अवघ्या तरुणाई ने जो काही उस्फुर्त जल्लोष केला, तो मन भारावून टाकण्यासारखा होता. या पार्श्वभूमीवरच,मी परवा नासिक हून पुणे ला रेल्वे ने प्रवास करत असताना एक तरुण भेटला. मग क्रिकेट च्या गप्पामध्ये ६-७ तासांचा प्रवास कसा निघून गेला कळलेच नाही. त्या गप्पांच्या ओघात तो तरुण एक गोष्ट बोलून गेला..ती फारच अस्वस्थ करणारी  पण तरीसुद्धा एक आशेचा किरण देणारी होती. तो म्हणाला, जेव्हा त्याने भारतीय क्रिकेट संघाला "वर्ल्ड कप " उचलताना पाहीले तेव्हा खूप आनंद झाला पण कुठेतरी खूप दुखः देखील झाले. मी विचारले का रे दुखः का ? तो म्हणाला, त्या क्रिकेट संघातील युवकांना देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली , आम्हा युवकांना ती मिळत नाही आहे. आमचे आयुष्य हे रोजच्या जगण्या मरण्याच्या लढाईतच संपत आहे. महागडे शिक्षण घेयून झाल्यावर नोकरी शोधण्यामध्ये बेरोजगार तरुणांची होणाऱ्या दयनीय अवस्थेचा तो  जिवंत उदाहरण होता. आजच्या युवा पिढीच्या नावाने हंबरडे फोडताना, या तरुण पिढीच्या मनात खदखदणारा असंतोष आणि त्यांचे व्यथित मन  समजून  घेण्यात काहीतरी चुकतेय..युवा मन समजून घेण्याचा प्रयत्न व्हायला हवा...तो या पुढे आपण करूच...

सध्या आपल्या भारत देशातले  वातावरण कसे  आहे , हे आपण रोज़ टी व्ही च्या माध्यमातून पाहतच आहोत. १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले असे आपल्याला लहानपणापासून शाळेत शिकवण्यात आले. परंतु देशासोबत केवढा मोठा धोका काही सत्तापिपासू  लोकांनी केला, याचे वर्णन आपण ऐकतच असाल. भारताच्या नैसर्गिक, दैवी , मानवी संपत्तीचे शोषण हे अहोरात्र चालू आहे, हजारो वर्षापासून..आधी परकीयाकडून आणि आता आप्तस्वकीयांकडूनच...एका बाजूला भ्रष्टाचार, महागाई, गरिबी, गुन्हेगारी, रोगराई , नक्षलवाद ,आतंकवाद , जल ,वायू यांचे प्रदूषण अशा समस्या त्याच्या चरण सीमांना पोहचल्या आहेत. तर दुसरीकडे भारत जागतिक महासत्ता  बनण्याच्या मार्गावर तीव्रतेने अग्रेसर होतोय. काही  भारतीयांना मनात याबाबत शंकाच आहे आणि ती रास्तदेखील आहे ..देशासमोर एवढ्या प्रखर समस्या उभ्या असताना आपण , महासत्ता होण्याचे स्वप्न बघूच कसे शकतो. परंतु  सद्य परिस्थितीमध्ये जगाला भेडसावणाऱ्या कित्येक समस्याचे समाधान, हे भारतीयांना मिळालेल्या पूर्वजांच्या ज्ञानाच्या वारशात दडलेले आहे. दुर्देवाने हे सगळे ज्ञान भारताच्या युवा पिढीपासून एक तर लपवून ठेवण्यात आले किंवा त्याच्या मनात त्याविषयी अनास्था निर्माण करण्यात आली. महात्मा गांधी, लोकमान्य टिळक , शहीद  भगत सिंग यांच्याबद्दल थोडीफार माहिती देण्यात आली. परंतु मोहनदास मधून "महात्मा ",  बाळ मधून "लोकमान्य " ज्यामुळे घडले, ती भगवदगीता आपल्याला शिकवण्यात आली नाही.

असो. आपण सर्वाना माहितीच असेल की, महाराष्ट्रातील अग्रणी समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली मध्ये "भ्रष्टाचाराची आरपार लढाई" सुरु झाली आहे. या चळवळीला किरण बेदी , श्री श्री रविशंकर , अरविंद केजरीवाल, बाबा रामदेव  यासारख्या मान्यवरांचे सहकार्य लाभले आहे. आपल्या मनात काही शंका असतील, की मागील जे ५०-६० वर्षे जे झाले नाही ते आता काय होणार, यातून काहीही होत नाही , होणार नाही. आपण एक लक्षात घेतले पाहिजे की, जे आपण आपल्या उघड्या डोळ्यांनी पाहतोय ती देशाची अवस्था आहे, क्षमता नव्हे. अरब देशामध्ये सध्या जी क्रांती चालू आहे, त्यावरून असे लक्षात येते की, जनतेने एकजूट दाखवली तर, कितीही शक्तिशाली व्यवस्था असो, ती मोडून काढता येतो... हा भारताचा ऐतिहासिक क्षणआहे

काही दिवसापूर्वी वाचनात आले होते की , प्लासी ची लढाई  जी इंग्रजासोबत झाली होती, त्यामध्ये जेवढे लोक लढत होते , त्याच्या कितीतरी पट लोक रस्त्याच्या बाजूला गंमत बघत उभे होते. नियतीची करणी बघा, गंमत बघता बघता  मनोरंजन करून घेताना, आपला देश गुलाम होईन पुढील १५० वर्षासाठी,  याची पुसटशी देखील कल्पना नसेल त्या प्रेक्षकांना... जर त्या प्रेक्षकांनी लढणाऱ्या लोकांना तेव्हा साथ दिली असती, तर आज भारताचा इतिहास हा काय असता हे वेगळे सांगायला नको. या गोष्टीची कल्पना आपणास लगेच येऊ शकते, जर आपण या गोष्टीकडे आपले लक्ष वेधले की , कित्येक भारतीयांनी सरकारी प्रोत्साहनाशिवाय जगात आपले स्थान निर्माण केले , देशवासीयांची मान अभिमानाने उंचावली.  जर या भारतीयांना सरकारी  प्रोत्साहन मिळाले असते तर, त्यांच्या मध्ये काय निर्माण करण्याची क्षमता होती..याची आपणास जाणीव झाली असती.

 आजचा  दिवस, अण्णांच्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस. मी ठरवले आहे..निकाल काय व्हायचा हो होईन या आंदोलनाचा ..पण मी कमीत कमी प्रेक्षकांमध्ये नाही राहायचे...म्हणून आजपासून अण्णांच्या आंदोलनाला पाठींबा म्हणून आजपासून उपवास करायचे ठरवले आहे...बघुयात देवाच्या कृपेने किती दिवस चालतो ते...ईश्वराने शक्ती द्यावी अशी  प्रार्थना ...
तुम्ही काय ठरवलेय ?.........



 तुम्ही  कसे  सहभागी  होयू शकता ?
तुम्ही पण उपवास करा अर्धा दिवस , १ दिवस, २ दिवस ..जेवढे शक्य होईन तेवढा करा...आपल्या घरी , ऑफिसमध्ये , शाळा, महाविद्यालय  मध्ये  जिथे असला  तिथे करा आणि हा ब्लोग फौलो करा ..उपवास सुरु केल्यावर  ब्लोग वर  कळवा.
 
उपवास सुरु करताना खालील उदाहरणाप्रमाणे माहिती कळवा.

नाव:
प्रदीप रमेश पाटील
शहर : पुणे
राज्य : महाराष्ट्र
मोबाईल क्रमांक :
ई-पत्ता (E-mail ID) :
दिनांक:  ७ एप्रिल २०११
किती काळ उपवास करणार  : २४  तास           



आई तुळजा भवानी शक्ती दे, भ्रष्टाचाराच्या भस्मासुराचे मर्दन करण्यासाठी.....
हर हर महादेव ..जय भवानी जय शिवाजी




|| यत्र योगेश्वरो कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर्ध्रुवा नीतिर्मतिर्मम ||


|| वंदे मातरम ||